अमळनेर:- तालुक्यातील करणखेडा येथील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील उत्साही कार्यकर्ते राजेश पांडे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या उपक्रमाला पुणेकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. वाचन संस्कृती जोपासणारी नवी संकल्पना या निमित्ताने रुजवण्याचे कार्य या माध्यमातून ते करीत आहे. मराठी संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर जोशी यांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली राजेश पांडे यांनी त्यांचा ग्रंथलेखक म्हणून सन्मान केला. अनेक विषयांची पुस्तके एकाच दालनात वाचकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राजेश पांडे यांनी केला म्हणून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 24 डिसेंबर पर्यंत या महोत्सवाचे आयोजन पुणे नगरीत आहे.