चेअरमनपदी गुलाबराव कदम, व्हाईस चेअरमनपदी सुशिल सोनवणे बिनविरोध…
सागर मोरे
पातोंडा ता. अमळनेर:- अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील पिक सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी गुलाबराव दगाजी कदम, तर व्हॉइस चेअरमन पदी सुशील रविंद्र सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संस्थेच्या कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत संस्थेचे सदस्य सुरेश कदम, निंबाजी कदम, विजय महाले, रविंद्र कदम,दिलीप कदम,राजेंद्र पाटील, बिपीन सोनवणे, बापुराव अहिरे यांच्या उपस्थितीत पिक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी गुलाबराव कदम तर व्हाईस चेअरमनपदी सुशिल सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे संस्थेचे सचिव डिगंबर पाटील यांनी प्रोसिडींगचे वाचन करुन जाहीर केले.त्यांच्या निवडीचे ग्रामस्थांकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.