अमळनेर – एक दिवशीय वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम प्रताप महाविद्यालय ग्रंथालय विभागामार्फत 7 रोजी राबविण्यात आला.
प्रा.डॉ.रमेश माने, प्रा.नितीन पाटील, प्रा.विजय तुंटे, प्रा.डॉ.ए.बी.जैन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.डी.आर.पाटील व प्रास्ताविक प्रा.डॉ.एस.वाय.सोनवणे यांनी तर आभार प्रा.डी.आर.पाटील यांनी व्यक्त केले. या वाचन कौशल्य कार्यशाळेत प्रा.नितीन पाटील यांनी वाचन कसे व का करावे, वाचनाचे फायदे, स्पर्धा परीक्षेतील ग्रामरचे महत्व, प्रसिद्ध लेखक लेखकांची वाचन कौशल्य विविध उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजून सांगितले. दिवसभरात एक पान तरी वाचा पण सजग वाचा असा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.ए.बी.जैन यांनी महाविद्यालयात एवढी संसाधने ग्रंथालयात असताना देखील वाचन प्रमाण विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये कमी असल्याचे नमूद केले, वाचन संस्कृती व वाचन कौशल्य यामध्ये कशी वृद्धी करता येईल याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजकाल विद्यार्थ्यांचे वाचन लेखन कमी झाले असून सोशल मीडियावर अधिक वेळ असतात अशी खंत प्राचार्यांनी व्यक्त केली. राज्य शासनाचा वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाबाबत व वाचन कौशल्य कार्यशाळेचा उद्देश सांगितला. प्रा.डॉ.रमेश माने यांनी वाङ्मयीन लेखन कौशल्यविषयी मार्गदर्शन करताना “निवडक परंतु ठळक घटना प्रसंगाची निवड करून समर्पक शब्दांची निवड करून साहित्य निर्मिती करावी. ती अनुभूती आनंददायी असते असे प्रतिपादन केले.