
अमळनेर – तालुक्यातील तळवाडे येथील ईश्वर उखा पाटील यांची रविकांत तुपकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी निवड जाहीर करण्यात आली.

ईश्वर पाटील यांनी कॉलेज जीवनापासूनच अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार मुक्त आंदोलनातून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यास सुरुवात केली. ते आम आदमी पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष म्हणून बारा वर्षे कार्यरत होते.उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव, पिकविमा, अतिवृष्टीचे पैसे, शेतीला पाणी, शेत रस्ते तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व शेतीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी लढा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या निवडीबद्दल जळगाव,धुळे,नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.