
.—
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाची शैक्षणिक, ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षा निमित्त महाविद्यालयीन शैक्षणिक सहल आणि ऐतिहासिक सहल महेश्वर येथे नेण्यात आली होती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी महेश्वर घाट ( मध्यप्रदेश ) येथे जाऊन विद्यार्थ्यांनी प्राचीन किल्ला, नदी घाट व अहिल्यादेवींचा लोककल्याण कारी
राज्य कारभार याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती घेतली, यावेळी विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तेथे जाऊन बोटिंग चा देखील आनंद घेतला,या शैक्षणिक आणि ऐतिहासिक सहलीत 30 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग होता.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सहस्रार्जुन मंदिर, अहिल्या ईश्वर महादेव,हातमाग उद्योग केंद्र, वस्त्र उद्योग केंद्र इत्यादी ठिकाणी आणि विविध स्थळांना देखील जाऊन भेटी दिल्या.
यावेळी सहल प्रमुख प्रा. डॉ. पवन पाटील,प्रा.डॉ.व्ही. डी. पाटील,प्रा.विजय पाटील आणि श्रीमती. मंजुषा गरुड हे सहली सोबत होते. गाईड (मार्गदर्शक) अश्विन यांनी संपूर्ण माहिती महेश्वर या ऐतिहासिक स्थळाची या प्रसंगी दिली.