माथेफिरू महिलेने गणपती मंदिराच्या मूर्तीवर मारले शेण…
अमळनेर : एका माथेफिरू महिलेने कुंटे रोडवरील सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या मूर्तीवर शेण मारल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला मात्र नागरिकांचा सामंजस्यपणा आणि पोलिसांची सतर्कता यामुळे अनर्थ टळला.

अमळनेर शहरात गणपतीच्या मंदिरावर कोणीतरी शेण मारले असे वृत्त शहरात पसरताच नागरिकांचा जमाव जमला. तणाव निर्माण झाला तशी पोलिसांनाही माहिती कळवण्यात आली. एपीआय रवींद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्यासह गोपनीय ,डी बी पथकातील पोलिसांसह इतरही पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि त्यासोबत काही प्रतिष्ठीत नागरिकांसह सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सिसीटीव्हीत एक माथेफिरू महिला हे कृत्य करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जातीय तणावाची अफवा हवेतच विरली आणि शांतता निर्माण झाली.
शांततेसाठी माजी नगरसेवक गोपी कासार,सूरज परदेशी, विजय पाटील, प्रमोद शिंपी, राकेश बारी, कांतीलाल वाणी, विवेक संकलेचा,सोनू बोरसे,शुभम देशमुख,आशिष दुसने यांच्यासह जय बजरंग मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.


