
अमळनेर:- तालुक्यातील अंतूर्ली येथे स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून सट्टा घेणाऱ्या दोघांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

२० रोजी जळगाव स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंतूर्ली येथे सट्टा घेणाऱ्यावर कारवाई केली. विष्णू सीताराम भील (रा. अंतूर्ली वय ३८) यास जागीच पकडले असता बाजूला सट्टा घेणारा हा बाजीराव भील (रा. पडासदले) हा पळून गेला. त्याठिकाणी जुगाराचे साहित्य व १८३० रू. रोख असा मुद्देमाल आढळून आला. त्यावरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.


