
अमळनेर : अज्ञात गुंडांनी पातोंडा येथील दोघांना लुटल्याची घटना २९ रोजी दुपारी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या.

पातोंडा येथील रहिवासी योगेश पाटील हे पारोळा येथे नोकरीनिमित्त ये जा करतात. दुपारी अज्ञात गुंडांनी नगाव गावाजवळ त्यांच्या मोटरसायकलला आडवी करून नाकावर बुक्का मारला आणि दोघांनी योगेश पाटील याला शेजारील मक्याच्या शेतात नेऊन पाठीला चाकू लावून पाकिटात असलेले दोन हजार रुपये व मोबाईल हिसकावून घेतला. तसेच त्यांचे कपडे फाडून मोटरसायकलची चावी घेऊन फरार झाले.
तसेच पातोंडा येथील सरपंचाचे पती विजय मोरे यांना फोन लावायचा आहे असे सांगत बहाण्याने त्यांचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान घटनेचे वृत्त कळताच हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील व इतर पोलिसांनी भेट दिली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.