
अमळनेर : जानेवारी २४ ते मार्च २५ दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण ३० रोजी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या नियंत्रणाखाली काढण्यात आले. एक अनुसुचित जाती , तीन नामाप्र आणि ९ सर्व साधारण आरक्षण निघाले आहे.

गाव आणि सरपंच आरक्षण पुढील प्रमाणे.
खडके (अनुसूचित जाती महिला) , रणाईचे खुर्द (नामाप्र ),दहीवद खुर्द (नामाप्र महिला) , लोण बुद्रुक (नामाप्र महिला) ,
सर्वसाधारण – कुऱ्हे खुर्द , दहिवद ,निसर्डी , मालपूर , रणाईचे बुद्रुक
सर्वसाधारण महिला – हिंगोणे बुद्रुक , तळवाडे ,लोण सिम , धार
सिद्धार्थ शिंदे या सहा वर्षाच्या बालकाच्या हातून चिठ्ठ्या काढण्यात आल्या. आरक्षण काढण्यासाठी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके , महसूल सहायक नितीन ढोकणे यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रशांत भदाणे , भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील , देसले ,शिवाजी पारधी , संजय पवार, गणेश पाटील ,विजय पाटील हजर होते.