अमळनेर : तालुक्यात अमळनेर शहराच्या कार्यक्षेत्राचे विभाजन होऊन आता एक ऐवजी तीन तर मंगरुळचे विभाजन होऊन दोन तलाठी सज्जे होणार आहेत.
वाढता कार्यभार पाहता २०१७ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी नवीन तलाठी सजा निर्माण करण्यासाठी अधिसूचना जाहीर केली होती. त्याची अमलबजावणी आता केली जात असून महसूल विभागाकडून भूमिअभिलेख विभागाकडे सजांची आखणी करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अमळनेर शहर सजेची तीन सजांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. अमळनेर मध्य सजेत – अमळनेर उत्तर , हिंगोणे शिव ,बोरी नदी , मंगरूळ शिव ,वाघोदे ,ढेकू शिव अमळनेर पूर्व सजेत – नंदगाव ,गांधली शिव,बहादरवाडी सुंदरपट्टी शीव ,हेडावे देवळी शीव , पळासदळे , बोरी नदी आणि अमळनेर उत्तर सजेत रंजाणे नंदगाव शीव , अमळनेर शीव , तांबेपुरा सानेनगर आदि भागांचा समावेश होणार आहे.
तर मंगरूळ सजेचे देखील दोन सजा होणार असून मंगरूळ उत्तर मध्ये अमळनेर धुळे रोड राज्यमार्ग , अंबासन शीव , अमळनेर शीव , पिंपळे बुद्रुक शीव तर मंगरूळ दक्षिण सजेत अमळनेर धुळे रोड राज्यमार्ग , लोंढवे फापोरे शिरूड शीव , अमळनेर शीव , लोंढवे वाघोदे शीव या भागाचा समावेश आहे. तर धार ही नवीन सजा तयार होऊन धार ,मालपूर , अंतुर्ली, रंजाणे या गावांचा समावेश असेल. सजांची अंतिम रचना झाल्यावर त्याठिकाणी स्वतंत्र तलाठी नेमण्यात येतील त्यामुळे प्रशासकीय कामाचा बोजा विभागला जाणार आहे. तर शेतकऱ्यांना व नागरिकांना देखील सोयीचे होणार आहे.