
सारबेटे बु. ग्रामस्थांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
अमळनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील सारबेटे बु. येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत तफावत झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,प्रधानमंत्री आवास योजनेच्या जाहीर झालेल्या लाभार्थ्यांच्या यादीत बहुसंख्य नावे ही ग्रामपंचायत सदस्य तसेच त्यांच्या नातलगांची असून त्यापैकी अनेकजण पक्क्या व आरसीसी च्या घरात राहत आहेत.गावातील गरजू,वंचित व बेघर असलेल्या लोकांना मात्र या यादीतून हेतुपुरस्कर वगळल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करून २९ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेची नक्कल मिळावी अशी मागणी करीम खा मेहबुब खा मेवाती,फारुख खा गनी खा यांनी केली आहे.