
७ हजार १०० क्विंटल एका दिवसाला आवक ; इतर मालही वाढला
अमळनेर:- येथील बाजार समितीत मालासाठी खान्देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील बाजार समिती आवारात शेतमाल विक्रीसाठी मोठी गर्दी सुरु झाली आहे. बाजार समितीच्या आवारात हरभराची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दि.२५ रोजी हरभऱ्याची आवक ७ हजार १०० क्विंटलपर्यंत गेली आहे.तर अजून पुढे विक्रमी आवक होण्याची शक्यता आहे.
खरीप पिके हातातून गेल्यानंतर मका, हरभरा, ज्वारी, दादर,तूर आदी पिकांची काढणी सुरू झाली आहे. मागील आठवड्यापासून रब्बी हंगामाची पिकवलेल्या धान्याची आवक सुरू झाल्याने बाजारसमिती आवारात वाहनांची गर्दी होऊ लागली आहे.दि.२५ रोजी बाजार समितीत सुमारे ७ हजार १०० किंटल हरभऱ्याची आवक झाली असून मालाला त्याच्या प्रतीनुसार भाव देण्यात आला आहे.
यंदा तालुक्यात रब्बी हंगामात हरभरा, मक्याचे पेरा मोठ्या प्रमाणावर होता.त्यामुळे बाजार समितीमधील धान्याची आवक वाढती आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतमाल बाजार समिती आवारात मोठ्या प्रमाणात विक्रीस आणल्याने गर्दी पाहायला मिळते आहे. शेतमालात प्रामुख्याने हरभरा,मक्याची आवक चांगल्या पैकी आहे. हरभऱ्याची आवक एवढ्या प्रमाणात वाढल्याने भाव स्थिर राहण्याची अपेक्षा शेतकर्यांना आहे.
अमळनेर मोठी बाजारपेठ
अमळनेरसह शेजारील शिंदखेडा, चोपडा तालुक्यातील चहार्डी अनवर्दे परिसर, धरणगाव, पारोळा या भागातून आवक येत असते. येथून रेल्वे रॅक देखील माल भरण्यासाठी लागतो. येथून हरभरा खरेदी करून तो परराज्यात रवाना केला जातो त्यातून कोट्यावधीची उलाढाल व्यापाऱ्यांची यातून होत असते. अमळनेर बाजार समितीत विकलेला मालाचे रक्कम शेतकऱ्यांना लगेच मिळत असल्याने व पारदर्शक पणे कारभार चालत असल्याने इतर तालुक्यातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात पसंती देतात.व लांबून माल विकण्यासाठी दाखल होतात.
दि २५ रोजी रब्बी हंगामातील धान्याची आवक
गहू – ४०० किंटल
लाल मका – २५०० किंटल
चापा हरभरा – ३५०० किंटल
काबुली हरभरा – ३५०० किंटल
तूर – ५०० किंटल

