
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळाच्या कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी नुकत्याच प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे झालेल्या तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात दोन पारितोषिके प्राप्त केली.

यात तृतीय वर्ष कला वर्गातील कु. नाजमीनबी पठाण हिने कथाकथन कला प्रकारात तृतीय तर प्रथम वर्ष कला वर्गातील कु. हर्षदा पाटील हीने बोलीभाषा- नाट्यछटा कला प्रकारात प्रथम क्रमांकाचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष देविदास साळुंखे, सचिव देविदास पाटील तसेच सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. डी. पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक -प्राध्यापकेत्तर कर्मचारी बंधूंनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत. असे महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी कळविले आहे.