
अमळनेर:- राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या आदर्श शिक्षिका वसुंधरा दशरथ लांडगे 2009 पासून जिजाऊ चरित्रग्रंथाचे पारायण करीत असून ह्यावर्षी 12 वर्षे पूर्ण झाली.
शिवश्री मदन पाटील लिखित ग्रंथ वाचत असतांना प्रत्येक प्रसंगाच्या माध्यमातून त्यांना खूप ऊर्जा मिळते. राजमाता जिजाऊ यांचे कार्य तमाम महिला वर्गांना प्रेरणादायी आहे. जिजाऊंचे विचार महिलांनी आपल्या मुलांना द्यावे हा संदेश त्यांनी आज जिजाऊ जयंती निमित्ताने दिला. काल त्यांच्या जिजाऊ जयंतीच्या दिवशी पारायणाची सांगता झाली. यावेळी मराठा सेवा संघाचे मनोहरनाना पाटील, प्राध्यापक लीलाधर पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, सूर्यकांत पाटील, विश्वास आबा, कैलास पाटील सर, विजय पाटील, डी एम पाटील, पत्रकार ईश्वर महाजन सर, वानखेडे भाऊसाहेब, सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे ,ईश्वर देशमुख, तेजस्विनी पाटील, मनीषा पाटील, वानखेडेताई, गुलाबराव देशमुख ,सामाजिक कार्यकर्ते धनुभाऊ महाजन ,नगरसेविका ज्योती ताई महाजन, आणि असंख्य जिजाऊ प्रेमींनी पारायणाला भेट दिली. यावेळी वसुंधरा लांडगे व दशरथ लांडगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.





