
अमळनेर :- रस्त्याच्या कडेला शौचास बसलेल्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या ६१ वर्षीय इसमास अमळनेर न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपी लोटन पंडित पाटील वय ६१ रा.कृष्णापुर ता.चोपडा याने ९ जानेवारी २०२४ रोजी गल्लीतील बालिका रस्त्याच्या बाजूला शौचास बसली असतांना आरोपीने तिच्यावर अत्याचार केला याबाबत चोपडा पोलिसात भादवी कलम ३७६, पोक्सो ४,८,१०,१२ तसेच अट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.तर घटनेतील आरोपीला दोनच दिवसात पोलिसांनी ताब्यात घेतले होते.तेव्हा पासून आरोपी कारागृहात होता.सरकारी अभियोक्ता ऍड आर.बी. चौधरी यांनी सदर खटल्यात ९ साक्षीदारांची तपासणी केली.त्यात अल्पवयीन पीडिता व फिर्यादी यांची साक्ष ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश वर्ग १ सौ.सी व्ही पाटील यांनी आरोपीस पोक्सो कायद्यात दोषी पकडून पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड,दंड न भरल्यास सहा महिने कैद अशी शिक्षा सुनावली. तर इतर कलमात निर्दोष मुक्तता करण्यात आली.सदर खटल्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल रणधीर,सहायक फौजदार उदयसिंग साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्ड,प्रमोद पाटील, भरत ईशी,सतीश भोई आदींनी सहकार्य केले.