
गट विकास अधिकारी एन.आर.पाटील यांचे प्रतिपादन
अमळनेर:- राज्य पाणी व स्वच्छता मिशन ,( SWSM ), मुंबई ,जल जीवन मिशन , जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगांव यांच्या सहकार्याने व राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर मुख्य संसाधन संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय 2024-25 या अर्थिक वर्षात महसूल गावातील एक महिला या प्रमाणे पाणी गुणवत्ता विषयक माहीती व प्रात्यक्षिक एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात गावातील निवडलेल्या पैकी एक महिला प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षण प्रसंगी मान्यवर एन.आर.पाटील गट विकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर, एस.एस.कठाळे विस्तार अधिकारी ग्रा.पं.पंचायत समिती अमळनेर, मनोहर मोरे सीआरसी, या प्रसंगी उपस्थित होते गट विकास अधिकारी एन आर पाटील यांनी पाणी गुणवत्ता प्रशिक्षण हे घेणे म्हणजे आपल्या गावातील पाणी नमुने चेक करणे हे काम पुढील काळात आपल्या मार्फत होणार आहे त्यासाठी आपल्याला शासन पातळीवर प्रत्येक गावातील ग्रामपंचायत मध्ये एफटिके किट देण्यात आले आहे त्याचा वापर करुन आपले काम करीत राहवे त्यासाठी पुढील काळात काम करण्यासाठी काहिहि मदत लागली तर ती देखिल आपण करुन देऊ असे देखील प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन पर सांगितले व प्रशिक्षण समारोप प्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थी यांना आपल्या हस्ते प्रमाणपत्र देखील देण्यात आले त्या प्रसंगी विषय तंज्ञ साधन व्यक्ती जीएसडिएचे विनोद साळुंखे, एनआरआयडी चे मास्टर ट्रेनर दिनेश पाटील, एफटिके किट चे मास्टर ट्रेनर कल्याणी पाटील राष्ट्रविकास संस्थेचे सचिव तुषार पाटील, संचालीका रागिणी महाले या प्रसंगी प्रशिक्षण कार्यक्रमात साधन व्यक्ती म्हणून सहभागी होते यांच्याकडुन सदर प्रशिक्षण व प्रात्यक्षिक यामध्ये सर्व महिलांनी पाणी कशाप्रकारे पाणी नमुने चेक करावे व पाण्याचे होणार परिणाम हे देखील सांगण्यात आले. प्रशिक्षण अतिशय चांगले पध्दतीने जीएसडीए चे पाणी गुणवत्ता तालुका अधिकारी यांच्याकडुन प्रशिक्षण देण्यात आले व सदर प्रशिक्षण दरम्यान राष्ट्रविकास संस्थेमार्फत सर्व प्रविण प्रशिक्षक यांनी सविस्तर प्रशिक्षण देऊन महिलांचे निरसन करण्यात आले त्या नंतर सदर महिला आपाआपल्या गावातील पाणी नमुने घरोघरी जाऊन चेक करावे असे नियोजन देखील करण्यात आले
सदर प्रशिक्षण दरम्यान नयना चौधरी , सिमा महाजन, विद्या पाटील, भाग्यश्री गोसावी , ज्योती पाटील, महेश माकडे , राहुल सुर्यवंशी, स्वंप्निल पाटील, हिलाल पाटील, गोरख पाटील,मुकेश पाटील, दिलीप पाटील, यांनी प्रशिक्षण साठी नियोजन केले तसेच सदर प्रशिक्षण हे राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष भुपेन्द्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे त्याचप्रकारे जिल्हा परिषद जळगांव सचिन पानझडे प्रकल्प संचालक ( पावस्व) जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन कक्ष जि.प.जळगांव,पाणी गुणवत्ता अधिकारी दिपक राजपूत, एचआरडी महेश सोनवणे तसेच जिल्हा जीएसडीए सर्व अधिकारी यांचे देखील प्रशिक्षण मध्ये सहकार्य मिळत आहेत.