
मोटरसायकलस्वार जागीच ठार, झाडी जवळील घटना…
अमळनेर : एस टी बस व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना २९ रोजी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास अमळनेर शिंदखेडा रस्त्यावर गलवाडे ते झाडी दरम्यान घडली.

शिरपूर हुन अमळनेर येणारी बस क्रमांक एम एच २० बी एल ११९२ व अमळनेर कडून शिरपूर जाणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच १८ बी टी ००९३ यांची समोरासमोर धडक झाली. त्यात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. मोटरसायकलस्वाराच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त सांडले आहे. अपघाताचे वृत्त पोलिसांना कळवण्यात आले आहे. मोटरसायकल मालकाचे नाव साहेबराव काशीराम पाटील रा तावखेडा असल्याचे मोटरसायकल क्रमांकावरून समजते. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. अपघात मारवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने त्यांनी मारवड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील यांना घटना कळवली. रात्री उशिरा मारवड पोलिसांत अमळनेर शिरपूर एसटी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

