
प्रताप महाविद्यालयात घडली घटना, परिवारावर शोककळा…
अमळनेर :- येथील प्रताप महाविद्यालयात पदव्युत्तर – एमएससीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा काल दि.२६ रोजी प्रॅक्टिकल सुरू असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला.

निलेश झांबरलाल पाटील असे या विद्यार्थ्याचे नाव असून निलेश चक्कर येऊन खाली पडताच मित्रांनी आरडाओरड केली असता तात्काळ विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी धावत आले. व निलेशला सर्वांनी अमळनेर येथील डॉ. बहुगुणे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तेथे डॉ. बहुगुणे यांनी तपासणी केली असता डॉ. बहुगुणे यांनी निलेशला मृत घोषित केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली असता डॉ. आशिष पाटील यांनी शवविच्छेदन केले. निलेशचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. निलेश पाटील हा पिंपळे रोड, भागातील रहिवासी असून त्याचे वडील सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक असून ते सध्या महावितरण कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या अकाली निधनाने त्याचे कुटुंब, मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.







