
व्हॉईस चेअरमनपदी जयश्री पाटील यांची निवड…
अमळनेर:- तालुक्यातील सबगव्हाण येथील विकासोच्या चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाची निवड बिनविरोध पार पडली.

दिनांक २६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय सबगव्हाण येथे ही विकासो चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड करण्यात पडली. चेअरमनपदी सुर्यकांत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी जयश्री राजेंद्र पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य अविनाश भिमराव पाटील, भरत श्रीराम पाटील, भाऊसाहेब सिताराम पाटील, भटु नामदेव पाटील, तुकाराम नारायण पाटील, सतीलाल विश्राम पाटील, भगवान गंगाराम पाटील, सचिन अशोक बेहरे, अनिता लक्ष्मण पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी आर .यु. पाटील होते. यावेळी सरपंच, उपसरपंच, सहाय्यक वारुळे, सचिव विजय पाटील (विजुआप्पा), रमण पाटील व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.







