
अमळनेर: तालुक्यातील लोण खुर्द येथे दि. 7 एप्रिल 2025 रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त लोणखुर्द ग्रामपंचायत, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर आणि जीवन ज्योती रक्तपेढी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व रक्तगट चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात एकूण 28 नागरिकांनी रक्तदान केले तर जवळपास 300 नागरिकांची रक्तगट चाचणी मोफत करून देण्यात आली. शिबिरास उदघाटक म्हणून मा. आमदार अनिल भाईदास पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अमळनेर कृउबा समिती सभापती अशोक पाटील, मार्गदर्शक म्हणून डॉ. जे. टी. शिंदे, डॉ.विजयकुमार ठाकरे, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. भिकनराव पाटील, डॉ. योगेश महाले होते. या शिबिरात भटू पाटील, अशोक पाटील, समाधान पाटील, मनोहर पाटील, हर्षल शिंदे, संदीप भील, यशवंत पाटील, मनोज पाटील, विकास शिंदे, आदित्य शिंदे, बाळासाहेब पाटील, प्रमेश पाटील, मुरलीधर पाटील, खुशाल पाटील, डॉ. विजयकुमार ठाकरे, सुनिल पाटील, निखिल पाटील, विनोद पाटील, भगवान पाटील, देवेंद्र पाटील, भिकन पाटील, कैलास पाटील, बापूराव मोरे, दीपक पाटील, रामकृष्ण पाटील, मा. सभापती अशोक पाटील, शशिकांत पाटील, सीमा पाटील यांनी रक्तदान करत मोलाची कामगिरी बजावली.