
विविध औषधी वाटप केल्याने भाविकांना दिलासा
अमळनेर-चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त दिनांक 6 एप्रिल रोजी राम नवमी च्या दिवशी श्री सप्तश्रृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भक्तांना श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपने गरमागरम अल्पोहार व थंडपेय वाटप करून क्षुधाशांती केली.

या सोबतच विजय मेडिकल च्या सौजन्याने विविध आजारांची औषधी व मलम वाटप करून पीडितांना दिलासा दिला.यासाठी मंगरूळ च्या पुढे फ्लोअर मिल समोर भव्य मंडप उभारण्यात आला होता,याठिकाणी भाविकांना आरामाची व क्षुधाशांती ची व्यवस्था करण्यात आली होती.याठिकाणी भाविकांना गरमागरम आलू वड्यांचा आस्वाद देण्यात आला.सोबतच गारवा मिळण्यासाठी कैरीचे पन्हे वाटप करण्यात आले.हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.जळगाव जनता बँक,अमळनेर शाखेच्या वतीने याठिकाणी जलसेवा ठेवण्यात आली होती.संपूर्ण
नियोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप तर्फे करण्यात आले असले तरी विजय मेडिकल,अमळनेर,जळगाव जनता सहकारी बँक,शाखा अमळनेर, गोविंद अग्रवाल परिवार,विनोद अग्रवाल परिवार, विनुभाई पटेल परिवार आणि ग्रुप सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले.याठिकाणी सेवा देण्यासाठी शहरातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच व्यापारी बांधव व युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत सदर वितरण सुरू होते.यासाठी गार्डन ग्रुपच्या या उपक्रमाचे संपूर्ण शहरात कौतुक झाले.