
डांगरची विस्तारित योजना आणि वीज जोडणी झाल्यास अमळनेर तालुका टंचाईमुक्त होणार…
अमळनेर : तालुक्यात १४२ गावांना पाणी पुरवठा योजना योजना पैकी ३० पाणी पुरवठा योजना १०० टक्के पूर्ण झाल्या असून ४१ योजना ७५ ते ९९ टक्के पूर्ण झाल्या आहेत. तर ३१ योजना १०० टक्के पूर्ण झाल्या आहेत. ४९ गावांच्या योजना फक्त वीज कनेक्शन साठी सुरू झालेंल्या नाहीत. या योजनांना वीज कनेक्शन मिळाल्यास आणि वेळेवर पांझरा नदीला आवर्तन सोडल्यास तालुका टंचाईमुक्त होणार आहे.
अमळनेर तालुका सतत अवर्षणग्रस्त क्षेत्रात मोडतो. तालुक्यात फेब्रुवारी मार्च पासून पाणी टंचाई जाणवत होती. आमदार अनिल पाटील यांच्या सतत पाठपुरावा आणि ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने तालुक्यातील १५४ गावांपैकी १४२ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय पेयजल योजनेनंतरंगत खेडी खुर्द प्र अमळनेर , अंतुर्ली , बोदरडे ,खवशी , गडखांब , वावडे ,भरवस , एकतास , पिंपळी प्र जळोद या गावांना पाणीपुरवठा योजना १०० टक्के पूर्ण झाल्या आहेत. तसेच पळासदळे , तांदळी, लोणपंचम , हिंगोणे बुद्रुक ,ढेकू चारम , बोहरे ,मुडी प्र अमळनेर , बोदरडे, प्रगणे डांगरी , बाम्हणे ,देवगाव देवळी , सुंदरपट्टी ,सबगव्हाण ,मांडळ, जुनोने ,एकरखी , बहादरवाडी ,शिरसाळे बुद्रुक , शिरसाळे खुर्द , अंतुर्ली रंजाणे या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर आंचलवाडी ,भोरटेक, चोपडाई ,ढेकू सिम , इंदापिंप्री ,जवखेडा , कावपिंप्री , निंब , लोण चारम ,लोण खुर्द ,लोंढवे , निसर्डी ,पिंपळे बुद्रुक ,पिंपळे खुर्द , रणाईचे खुर्द नवी वस्ती , सडावण बुद्रुक चाकवे , सडावण खुर्द , रामेश्वर बुद्रुक , धावडे ,मालपूर ,खोकरपाट , निमझरी , झाडी , भरवस ,वाघोदे , ढेकू सिम रणाईचे, कळमसरे, मेहेरगाव , कुऱ्हे बुद्रुक ,वावडे , भरवस लोण पंचम , गडखांब व इतर दोन गावे , हेडावे ,कुऱ्हे खुर्द , नगाव बुद्रुक ,नगाव खुर्द , पाडळसरे ,शिरूड ,सोनखेडी ,शहापूर या गावांच्या योजना ७५ ते ९९ टक्के पूर्ण झाल्या आहेत.
काही गावांना टाकी साठी जागा नाही तर काही गावांना विरोध यामुळे योजना अपूर्ण किंवा सुरू झालेल्या नाहीत. मंगरूळ येथे बोरी नदीवरून योजना मंजूर आहे मात्र गावकऱ्यांनी तापी नदीवरून पाणी मागितल्याने योजना सुरू होऊ शकली नाही. त्यासाठी जादा खर्चाला मंजुरी लागणार आहे.
दरम्यान अमळनेर तालुक्यातील काही गावांना यापूर्वी तीन तीन पाणी पुरवठा योजना होऊन देखील पाणी मिळालेले नाही. तत्कालीन जिप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित जबाबदार यंत्रणेवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र काही कर्मचारीच व राजकीय नेते योजनांमध्ये पार्टनर असल्याने कोणावरच गुन्हे दाखल झाले नाहीत. शासनाचे कोट्यवधी रुपये वाया गेले असून त्याचा बोजा जनतेवर पडला आहे. आता त्याच गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना होत आहेत. आता तरी योजना पूर्ण चालू करून त्या कार्यान्वित कराव्यात अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
वीज कनेक्शन नसलेल्या ४९ गावांच्या पाणी पुरवठा योजनांची वीज जोडणी प्रक्रिया सुरु झाली असून एप्रिल अखेरपर्यंत वीज जोडणी करून पाणी पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत त्यामुळे टंचाई जाणवणार नाही.- दिलीपराव पाटील, उपविभागीय अभियंता,अमळनेर विभाग
पाणी पुरवठा योजनेच्या वीज जोडणीत कुठलेही अडथळे निर्माण करू नका अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीला आवर्तन सोडण्यासाठी जिल्हाधिकारीशी चर्चा झाली आहे. ते जिप च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देतील त्यानुसार धुळे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवर्तन सोडले जाईल. –अनिल पाटील ,आमदार ,अमळनेर विधानसभा मतदार संघ