
नागरिकांचे मुख्याधिकारीना निवेदन
अमळनेर-येथील ढेकू रस्त्यावरील लक्ष्मी नगरात रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी न प मुख्याधिकारीना निवेदन देऊन केली आहे.

यात म्हटले आहे की सदर रस्त्याचे काम 7 ते 8 महिन्यापासून सुरू असुन तेव्हापासून रस्ता खोदून ठेवल्याने नागरिक त्रास सहन करीत आहेत.आता 8 दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू झाले असून रस्त्यावर खडी टाकली गेली आहे.मात्र खडीवर मुरूम न टाकता पिवळी माती टाकली जात आहे.याबाबत नागरिकांनी टोकले असता ही माती नसून मुरूमच असल्याची दिशाभूल ठेकेदाराची माणसे करीत आहेत.तरी आपण स्वतः भेट देऊन कामाची पाहणी करावी व मंजूर इस्टिमेट प्रमाणे काम करण्यास भाग पाडावे अशी विनंती नागरिकांनी केली आहे.

सदर निवेदनावर सुधीर सोनवणे,व्ही आर मोरे,दिलीप पाटील,शांतीलाल पाटील,सुनंदा शिरसाठ, पूनम पाटील,संजय वानखेडे, भागवत पाटील,विजय राणे आदींच्या सह्या आहेत.


