
अमळनेर : तालुक्यातील बिलखेडा येथे ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.

उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या आदेशान्वये ८ रोजी बिलखेडा येथे मंडळ अधिकारी वाय आर पाटील , मंडळ अधिकारी पी एस पाटील, व ग्राम महसूल अधिकारी अभिमन जाधव ,विक्रम कदम ,आशिष पारध्ये , जितेंद्र पाटील , राजेंद्र केदार , पवन शिंगारे , जितेंद्र जोगी , सुधीर पाटील यांच्या पथकाने साबीर पठाण आणि विशाल नंदलाल गुजर या दोन जणांचे ट्रॅक्टर अवैध रित्या वाळू वाहतूक करताना आढळले असता त्यांच्यावर कारवाई केली आहे. ट्रॅक्टर तहसीलला जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.



