
अमळनेर : अल्पवयीन मुलीला कार मध्ये घालून पळवून नेल्याची घटना ६ रोजी दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास तांबेपुरा भागात रेल्वे पुलाजवळ घडली.

तांबेपुरा न्यू प्लॉट भागातील एक १७ वर्षे ७ महिने वयाची मुलगी आपल्या बहिणीसोबत महादेव मंदिराजवळ लग्नात जेवायला गेली होती. दुपारी १२:४५ वाजता शुभम किशोर पारधी रा धरणगाव हा लाल रंगांच्या कार मधून आला आणि मुलीला पळवून घेऊन गेला. मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून शुभम पारधी विरुद्ध भारतीय न्याय संहिता १३७(२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.



