अमळनेर:- तालुक्यातील कलाली येथे गुरे चारण्यासाठी गेलेल्या एकाचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बारकू चंद्रा भील (वय ४३) हे गुरे चारण्यासाठी गेले असता तापी नदीत पडले. याची माहिती मिळाल्यावर गावातील १० ते १५ जणांनी मिळून तापी नदीत उतरून पाण्यात शोध घेतला असता पाण्याच्या खोल कपारीत अडकून असल्याचे दिसून आले. त्यांना बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यावरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.