अमळनेर:- येथील प्रताप कनिष्ठ महाविद्यालय, अमळनेर येथे स्थानिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (ज्यूक्टो) यांची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रताप महाविद्यालयाच्या सानेगुरुजी सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या सभेत २०२२-२०२५ ह्या कालखंडाची त्रैवार्षिक नूतन कार्यकारणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून प्रा. दिनेश बोरसे, उपाध्यक्ष प्रा. एम्. एन्. भामरे, सचिव प्रा.स्वप्नील पवार, खजिनदार प्रा.सी. आर. पाटील, जेष्ठ सल्लागार प्रा.दिनेश व्हि.भलकार व कार्यकारीणी सदस्य पदी प्रा.किरण पाटील, प्रा.प्रशांत ठाकूर, प्रा.विलास पाटील, प्रा.पंकज तायडे, प्रा.सौ.प्रतिमा लांडगे, जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणू प्रा. आर.एम्.पारधी, प्रा.जी.एल. धनगर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.यू.जी. मोरे यांनी काम पाहिले. या नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल खान्देश शिक्षण मंडळ या संस्थेचे कार्याध्यक्ष, उपकार्याध्यक्ष, समस्त संचालक मंडळ, सचिव, प्रताप कॉलेजचे प्राचार्य , उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.