
अमळनेर : तालुक्यातील हिंगोणे बु येथील तीस वर्षीय तरुणाचा भोरटेक ते अमळनेर दरम्यान रेल्वे रुळाच्या दरम्यान मृतदेह ७ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास आढळून आला.

भूषण भगवान जाधव (वय ३०) असे या मयत तरुणाचे नाव असून केदारसिंग जाधव यांनी खबर दिल्यावरून मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत..



