
अमळनेर : आयपीएल सामन्यांवर मोबाईल च्या माध्यमातून सट्टा खेळताना पोलिसांनी रंगेहात पकडून बालाजी पुरा व वड चौकातील दोघांना अटक करून त्याच्याजवळील मोबाईल जप्त केला आहे.

५ रोजी परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले याना गोपनीय माहिती मिळाली की बालाजी पुरा भागात प्रसाद पांडुरंग साळी हा मोबाईलवर आयपीएल सामान्यांसाठी लोकांकडून पैसे स्वीकारून सट्टा खेळत आहे.

बारबोले यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , हेडकॉन्स्टेबल संतोष पवार , अमोल पाटील ,जितेंद्र निकुंभे याना छापा टाकण्यास पाठवले. रात्री पावणेसात वाजता पथकाने छापा टाकला असता प्रसाद साळी हा आयपीएल सामन्यावर सट्टा खेळताना आढळून आला त्याला विचारपूस केली असता आकाश महेंद्र पवार रा वडचौक याच्या सांगण्यावरून तो आयपीएल सामन्यावर सट्टा खेळवत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा मोबाईल आणि ३१०रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रसाद साळी आणि आकाश पवार यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायदा १२ (अ) , भारतीय न्याय संहिता कलम ४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचे आयडी आणि कोणत्या सामन्यांवर किती रुपयांचा सट्टा खेळला याचा शोध घेत आहेत.


