
अमळनेर : देवगिरी प्रांत, केशव प्रतिष्ठान व समाज कल्याण विभागाचे जिल्हा प्रशासनच्या संयुक्त विद्यमाने तर्फे अमळनेर तालुक्यातील ५३ दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात येऊन ३३ जणांना खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते कृत्रिम पाय व हात वाटप करण्यात आले.
दिव्यांग बांधवांना हात पाय अभावी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी , तसेच त्यानाही सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे समाजात वावरता २८ रोजी पिबीए इंग्लिश मीडियम स्कूल च्या रोटरी हॉल मध्ये दिव्यांग बांधवांचे मोफत तपासणी शिबीर घेण्यात आले. याच ठिकाणी दिव्यांग बांधवांच्या हाता पायांची मापे घेऊन मशीनरीच्या साहाय्याने योग्य क्रिया करून कृत्रिम हातापायाचे रोपण करण्यात आले. त्यामुळे दिव्यांग बांधवांना बळ मिळाले ते त्याच ठिकाणी हातापायांची हालचाल करून चालू फिरू लागले.
कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ , जेष्ठ स्वयंसेवक नरेंद्र निकुंभ , प्रा डी डी पाटील , आनंद माळी , सुरेंद्र साळुंखे ,स्वर्णदीप राजपूत , संकल्प वैद्य , हेमंत सैंदाणे , हितेश शहा ,लालचंद सैनानी ,अशोक पाटील , राकेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी केले.

