
अमळनेर : पंधरा दिवसांपासून तांबेपुरा भागात पाणी येत नसल्याने शिवसेना (शिंदे गट) उपशहर प्रमुख प्रवीण पाटील याने नगरपालिकेत आंघोळ आंदोलन केल्याने दुपारी पालिकेने पाणीपुरवठा केला आणि विशेष म्हणजे जास्त वेळ पाणीपूरवठा केला.

क्रमाने प्रत्येक भागात पाणीपुरवठा करण्याऐवजी नंतरच्या भागात आधी पाणीपुरवठा केल्याने तांबेपुरा भागात पंधरा दिवस पाणी पुरवठा झाला नव्हता. प्रवीण पाटील याने घरी पाणी नसल्याने पालिकेतच आंघोळ करण्याचे अनोखे आंदोलन केले.

