
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड
अमळनेर– कांताई सभागृह, जळगाव येथे घेण्यात आलेल्या 7 वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणीत अमळनेरचा मृगांक सागर पाटील हा मुलांच्या गटात पहिला आला असून पुणे येथे राज्यस्तरीय निवड स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे तो प्रतिनिधित्व करणार आहे.

दि 5 व 6 मे रोजी पुणे येथ राज्यस्तरीय निवड स्पर्धा होणार आहे.मृगांक हा गणराज हॉस्पिटल चे डॉ सागर पाटील व प्रताप महाविद्यालयाच्या प्रा प्रियांका पाटील यांचा मुलगा असून स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलचा तो विद्यार्थी आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

