
अमळनेर:- तालुक्यातील रणाइचे येथील एका घरासमोरून ५ शेळ्या व एक बोकड असा एकूण ३० हजाराचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

रणाइचे येथील गोडमबाई जीवन पाटील या त्यांच्या पतीसह राहतात.२५ रोजी सायंकाळी त्यांनी त्यांच्या घरासमोर ६ शेळ्या,१ बोकड आणि ८ म्हशी असे पशुधन बांधून ठेवले होते.रात्री १० वाजता गुरांना चारा टाकण्यासाठी जीवन पाटील हे बाहेर आले,नंतर ते झोपून गेले.
रात्री ११.३० वाजता गुरांचा आवाज येत असल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर बांधलेल्या गुरांपैकी ५ शेळ्या व १ बोकड जागेवर दिसून आले नाही.इकडे तिकडे शोध घेतला असता शेळ्या व बोकड मिळून आले नसल्याने कुणीतरी अज्ञाताने ते चोरून नेल्याची त्यांची खात्री झाली.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे करत आहेत.

