चालकाने सतर्कता बाळगत वाचविले प्रवाशांचे प्राण…
अमळनेर:- प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना अमळनेर गांधली रस्त्यावर दिनांक ३ रोजी सकाळी घडली आहे.
अमळनेर ते लासुर प्रवासी वाहतूक करणारी कालिपिलीचे डिझेल लिक झाल्याने चारचाकीच्या पुढच्या भागाने अचानक पेट घेतला. गाडीत दहा ते बारा प्रवासी बसले होते. चालकाने सतर्कता बाळगली आणि तातडीने वाहन थांबवून सर्व प्रवाश्याना खाली उतरवल्याने कोणालाच इजा झाली नाही. याबाबत पोलीस स्टेशनला कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.