कार्यालय उदघाटन कार्यक्रमासह तालुक्यात विविध ठिकाणी देणार भेट…
अमळनेर:- महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे हे शनिवार दि 7 मे रोजी अमळनेर दौऱ्यावर येत आहेत.
याप्रसंगी ना. मुंडे विविध ठिकाणी भेटी देणार असून सकाळी ८:४० वाजता मंगळ ग्रह मंदिर, ८:५० वाजता समाजकल्याण वसतिगृह भेट, ९:०० ते १०:०० दरम्यान अमळनेर येथे संवाद मेळावा, १०:१० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा, त्यानंतर बाजार समिती भेट, मंगरुळ येथे राष्ट्रवादी शाखेचे उद्घाटन, त्यानंतर सकाळी ११ वाजता इंधवे ता.पारोळा येथे संवाद मेळावा असा दौरा असणार आहे. दरम्यान अमळनेरात ना. मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी आ. अनिल पाटील व कार्यकर्त्यांनी केली आहे.