मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार मोहिमेची सुरुवात…
अमळनेर:- येथील अमळनेर पोलीस ठाण्याच्या वतीने जातीय सलोखा स्वाक्षरी मोहीमेचे आयोजन आज दि ७ मे रोजी तिरंगा चौकात करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे जळगांव यांच्या संकल्पनेतून जातीय भेदभाव नष्ट होवून सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी या स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर शहरात तिरंगा चौक येथे दि. ७ मे रोजी सकाळी ९ पासुन “जातीय सलोखा स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात होणार असून शहरातील व तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते-कार्यकर्ते, सामाजिक व धार्मिक संघटना, पत्रकार, विविध संस्थेचे ट्रस्टी, रोटरी क्लब, जॉगिंग ग्रुप, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, डॅाक्टर्स, वकील, इंजीनियर, व्यापारी, शांतता व महिला समिती सदस्य, पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य , पोलीस मित्र, महिला संघटना व सर्व जाती धर्माचे नागरिक, महिला व मुले, सराफ-व्यापारी असोसिएशन, प्रिंटींग असोसिएशन, सर्व सामाजिक-सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच अमळनेर शहर व तालूकावासीय यांनी या मोहीमेत सहभाग घेऊन आपले मत थोडक्यात नोंदवावे, अशी विनंती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केली आहे.
मारवड पोलीस ठाण्यातर्फे ही आयोजन….
तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यातर्फे ही जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून दि. ७ मे रोजी मारवड येथील चौकात मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन स.पो. नि. जयेश खलाणे यांनी केले आहे.