
मंगरूळ ग्रामपंचायतीने केली जि. प. शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांना घरपट्टी आणि पाणी पट्टी माफ…

तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे व पिंपळे बु येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांनी, फुग्यांनी आणि मनमोहक सजावटीने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. आजच्या कार्यक्रमाचे पिंपळे बु चे माजी सरपंच अध्यक्ष योगेश पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते युवराज दगा पाटील , जिल्हा महिला समन्वय सरपंच परीक्षेत मुंबई (महाराष्ट्र) प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच पिंपळे खु सौ वर्षा युवराज पाटील पिंपळे बु गावाचे सरपंच राहुल शालीक पाटील, तसेच जवखेडा येथील पालक सुभाष दिगंबर खलाणे, धनराज भटूगीर गोसावी, पुरुषोत्तम लोटन चौधरी अविनाश पाटील उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक संजय भोसले सर यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन वर्षाबद्दल शुभेच्छा दिल्या. पिंपळे खुर्द येथील प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्षा युवराज पाटील ,दगा राजधर पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी दोन्ही शाळेमध्ये दीड दीडशे वह्या यावेळेस देण्यात आल्या यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपळे बुद्रुक माजी सरपंच योगेश पाटील यांनी 25 विद्यार्थ्यांना शाळाचे गणवेश त्यांच्यामार्फत जाहीर केले. मान्यवरांच्या हस्ते पुस्तक, वह्या आणि दप्तर वाटप करण्यात आले सूत्रसंचालन शिरसाठ मॅडम यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री.सी एन पाटील सर ,श्री.डी बी पाटील सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,जि प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बागुल सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते


शहरातील खा.शी मंडळ संचलित श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत खासदार स्मिता वाघ यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांसह विद्यार्थ्यांचा सत्कार केला. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.त्यावेळी शाळेच्या परिसरात आपल्या पाल्यासह बरेच पालक उपस्थित होते.त्यावेळी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील, शाळेचे चेअरमन निरज अग्रवाल, संचालक हरी अण्णा वाणी, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, डॉ.संदेश गुजराथी,शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी,पर्यवेक्षिका एस.पी. बाविस्कर, राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भारती आठवले,जी.एस हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.एम.कदम,ज्येष्ठ शिक्षक एस.एस माळी,करुणा शिक्षक डी.एन पालवे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. सर्व शिक्षकांनी नवागत विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव केला.सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्यानंतर स्मिता वाघ यांनी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना पुस्तक वाटप केले.सूत्रसंचालन श्रीमती. एस.एस.देवरे तर आभार मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी यांनी केले. नवोगत प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.

तालुक्यातील खेडी बु. येथील जि.प.प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष 2025-2026 शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यातआले.तसेच शै.सत्राच्या पहिल्या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक , मोफत शालेय गणवेश व मोफत एक जोड बूट व दोन जोड पायमोजे वाटप करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी माता पालक सरिता परदेशी,श्रीम. लताबाई भिल,शिक्षणप्रेमी Aराकेश पाटील,अंगणवाडी सेविका शोभाबाई पाटील व स्वयंपाकीताई अलका पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्रीम.भारती चौधरी यांनी केले.आभार प्रदर्शन युवा प्रशिक्षणार्थी श्रीम.योगिता पाटील यांनी केले.

अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल व र.सा.पाटील प्राथमिक विद्यामंदिरात शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी १६ जून रोजी खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. खासदार स्मिता वाघ यांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत केले.या अनोख्या स्वागताने विद्यार्थी व पालक भारावले. यावेळी शाळेला आकर्षक रांगोळी,तसेच फुग्यांचा सहाय्याने सजविण्यात आलेले होते.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील,खानदेश शिक्षण मंडळाचे कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल,जी.एस.हायस्कूल चे चेअरमन हरी भिका वाणी,संचालक योगेश मुंदडा,प्रदीप अग्रवाल,मुख्याध्यापक व्ही.एम.पाटील,उपमुख्याध्यापक ए. डी.भदाणे,प्राथमिक च्या मुख्याध्यापिका एस.पी.शिसोदे,पर्यवेक्षक एस.आर.शिंगाने, सी.एस.सोनजे,ज्येष्ठ शिक्षक एस.पी.वाघ,मुख्य लिपिक शाम पवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांना घरपट्टी आणि पाणी पट्टी माफ करून सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक विद्यालय तसेच जि प प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
मंगरूळ येथील सरपंच समाधान आधार पारधी उपसरपंच श्रुती श्रीकांत पाटील व सर्व सदस्यांनी मराठी शाळांचा दर्जा वाढावा , मराठी स्वाभिमान जागृत व्हावा म्हणून जिप शाळेत प्रवेश घेणाऱ्यांना कर माफी करण्याचा ठराव मंजूर केला.
शाळेच्या पहिल्याच दिवशी स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात सरपंच समाधान पारधी , उपसरपंच श्रुती पाटील , संस्थेचे सचिव श्रीकांत पाटील , उपाध्यक्ष पियुषा पाटील यांनी विद्यार्थ्याना पुस्तके वाटप करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच इंदिरानगर वस्ती शाळेत देखील विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त मोफत गणवेश ,पुस्तके आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनतर जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेची सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना गणवेश , पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी योगेश पाटील , अमोल पाटील , राजेंद्र पाटील , चंद्रकांत पाटील , राजेश पाटील मुख्याध्यापिका उषा भदाणे , नीलम चौधरी , सोमनाथ विसपुते ,लालचंद गोपाळ , भटू पाटील , मुख्याध्यापक प्रकाश पाटील , अशोक सूर्यवंशी ,प्रभुदास पाटील ,संजय पाटील , सुषमा सोनवणे , सीमा मोरे , शीतल चव्हाण , रुपाली पाटील , सचिन अहिरे हजर होते.

शहरातील सरस्वती विद्या मंदिर येथील परिसरात शाळा प्रवेशोत्सवाची रांगोळी काढण्यात आली होती. ठिकठिकाणी विविधरंगी फुगे लावून परिसर सुशोभित करण्यात आला होता. पारंपारिक पद्धतीने शिक्षिका सौ.संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले.याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले. उपशिक्षक ऋषिकेश महाळपूरकर यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप केले तर शिक्षिका सौ.गीतांजली पाटील,पूनम पाटील यांनी रांगोळीत अक्षर गिरवून,शैक्षणिक साहित्यातून अंक ओळख करून घेऊन शालेय शिक्षणाचा शुभारंभ करून घेतला.विद्यार्थ्यांनी शाळा प्रवेशोत्सव आठवणीसाठी स्वतंत्र सेल्फी पॉइंट “माझी शाळा सरस्वती विद्या मंदिर,स्कूल चले हम” फ्रेम मध्ये शिक्षक धर्मा धनगर,आनंद पाटील यांनी सेल्फी काढून घेतले. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सवानिमित्त मिष्ठान्न शालेय पोषण आहारात देण्यात येऊन विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गोड करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद व हेमंत बडगुजर, किरण पाटील यांनी सहकार्य केले.

