संवेदनशील मतदान केंद्र, व इतर बाबतीत केल्या सूचना…
अमळनेर:- लोकसभा निवडणुकीनिमित्त अमळनेर विधानसभा मतदार संघात निवडणूक निरीक्षक राहुल गुप्ता यांनी भेटी दिल्या.
निरीक्षक गुप्ता यांनी अमळनेर विधानसभा मतदार संघातील काही संवेदनशील मतदान केंद्रे, स्ट्रॉंग रूम आणि काही सर्वसाधारण मतदान केंद्राना भेटी दिल्या. स्ट्रॉंग रूम सुरक्षाबाबत, वृद्ध, दिव्यांग मतदारांना अडचणी येऊ नयेत, उन्हाळ्याचा त्रास कोणाला होऊ नये याची काळजी घ्यावी , संवेदनशील मतदान केंद्रांबाबत दक्ष रहावे अशा सूचना उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना केल्या.
निरीक्षक गुप्ता यांनी स्ट्रॉंग रूम, साहित्य वाटप, साहित्य स्वीकृती केंद्र, ईव्हीएम मशीन सेटिंग व सिलिंग आदीबाबत माहिती जाणून घेतली. झामी चौक, गांधलीपुरा, जिनगर गल्ली, पारधीवाडा, भांडारकर गल्ली, बाहेरपुरा, मुठे गल्ली आदी भागातील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.