जिल्हा बँकेने घेतलेल्या निर्णयाचा शेतकरी करतायेत विरोध…
अमळनेर:- प्रत्येक पिक कर्जदार शेतकऱ्याकडून २०० रुपये प्रोसेसिंग फी वसूल करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने ११ मे रोजी घेतला आहे.
बँकेचे सरव्यवस्थापकांनी शाखांना दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे की, अल्पमुदत पीक कर्जावर प्रत्येक शेतकऱ्याकडून प्रती सभासद २०० रुपये केसीसी प्रोसेसिंग फी आकारण्यात येणार आहे. १ एप्रिल ते ११ मे पर्यंत कर्ज वाटप झालेल्या शेतकऱ्याकडून प्रोसेसिंग फीची रक्कम कर्ज खाती टाकून व्यवहार केला जाईल. एसबीकेसिसी खात्यात रक्कम नसल्यास बचत खात्यातून ती वर्ग केली जाईल. ज्यांच्या बचत खात्यात ही रक्कम नसेल अश्या खातेदारांची यादी शाखांना देवून शाखेमार्फत ती वसुली केली जाईल. व १२ मे पासून ज्यांना पीककर्ज वाटप होईल त्यांनाच मन्यूअली पद्धतीने कर्ज खाती रक्कम नावे टाकून फी वसूल करावी. मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली असून संघटित होवून या निर्णयाचा विरोध करण्याचे नियोजन सुरू आहे.
प्रत्यक्षात शेतकरी हा विकासो संस्थेचा सभासद असतो. व शेतकरी बँक कडून नाही तर संस्थेकडून कर्ज घेतो. तरी बँकेने शेतकऱ्याकडून 200 रुपये दर वर्षी प्रोसेस फी अश्या गोंडस नावाने शेतकऱ्यांचा कर्जाच्या रकमेवर ही डाका टाकण्याचा डाव केला असून सर्व शेतकरी, सर्वपक्षीय पदाधिकारी, सभासद बंधू यांनी या निर्णयाचा निषेध करावा व निषेधाच्या जोरावर हा निर्णय बँकेला मागे घेण्यास भाग पाडावे, असे आवाहन प्रा. सुभाष पाटील यांनी केले आहे.