
पातोंडा परिसरातील भूजल पातळीत होणार वाढ…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथे मनपाचे माजी उपायुक्त कपिल पवार यांच्या विशेष प्रयत्नातून गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन इरीगेशन जळगाव व पातोंडा परीसर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जलपुनर्भरण अंतर्गत पातोंडा, दापोरी बु. व खवशी या गावांमध्ये भूजल पातळीत वाढ व्हावी या उद्देशाने रीचार्ज शाफ्ट करण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील , पातोंडा सरपंच भरत बिरारी , खवशी सरपंच कैलास सुर्यवंशी , दापोरी सरपंच मृणाल पाटील सरपंच दापोरी यांच्या हस्ते दापोरी शिवारातील नाल्यात नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
याअंतर्गत दापोरी बु. व खवशी येथे प्रत्येकी 3 व पातोंडा येथे 4 रीचार्ज शाफ्ट केले जाणार आहेत. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील व उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पातोंडा परीसर विकास मंचचे काम उल्लेखनीय असून ख-या अर्थाने पंचक्रोशीतील शेतक-यांच्या विकासासाठीचे कार्य कौतुकास्पद आहे. या नालाखोलीकरण व रीचार्ज शाफ्टमुळे परीसरात शेतक-यांच्या विहीरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत विशेष वाढ होऊन भविष्यात शेतकरी सधन होण्यास मदत होणार आहे.येणा-या काळात रेन वाॅटर हार्वेस्टींग क्षेत्रात पुढाकार घेतल्यास जैन इरीगेशन व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकार्य लाभेल असे आश्वासन सुधीर पाटील यांनी दिले. याप्रसंगी दापोरी येथील एल टी पाटील , विकासो संचालक कैलास पाटील, विजय पाटील , रविंद्र पाटील , दिलीप पाटील, हिरालाल भिल , केशव पाटील , सोनखेडी येथील संदिप पाटील , पातोंडा येथील घनश्याम पाटील उपसरपंच नितीन पारधी, सोपान लोहार , महेंद्र पाटील, उमेश पाटील, राजन बिरारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन विलास चव्हाण तर आभार प्रदर्शन भुषण बिरारी यांनी केले.




