
अमळनेर : तालुक्यातील डांगर येथील एक ३३ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार अमळनेर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
पती शेतात गेला असतांना घरातून निघून गेल्याची घटना ६ जुलै रोजी घडली. बेपत्ता महिलेच्या पतीने अमळनेर पोलिसात खबर दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.

