
अमळनेर:- शाळेत मुलाला घ्यायला आलेल्या महिलेचे बस मध्ये चढताना मंगळसूत्र चोरल्याची घटना १७ रोजी घडली आहे.
उदयनगर येथील प्रतिभा राजेश वाघ (वय ३९) ह्या आपल्या मुलाला अमळनेर येथे शिक्षणासाठी रोज सोडायला व घ्यायला जात असतात. १७ रोजी सायंकाळी ५:१५ वाजता त्या आपल्या मुलाला सोबत घेऊन उदयनगर बस मध्ये चढत असताना बरीच गर्दी होती. बसमध्ये चढल्यानंतर मंगळसूत्राची पोत तुटल्याचे प्रतिभाबाईच्या लक्षात आल्याने पाहिले असता सोन्याच्या दोन वाट्या व सोन्याचे मनी दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी व इतर प्रवाशांनी शोध घेतला मात्र मनी आणि वाट्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री झाल्याने प्रतिभा वाघ यांनी १८ हजार किमतीच्या ३ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या वाट्या व सहा हजार किमतीचे एक ग्रॅम वजनाचे मणी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ संतोष पवार हे करीत आहेत.

