प्रशासनाला मा.नगरसेविका कमलबाई पाटील व रवि पाटील यांचे निवेदन…
अमळनेर:- पावसाळ्यात नाल्यांचे पाणी कॉलनी भागात शिरू नये याकरीता उपाययोजना करण्याबाबत मा.नगरसेविका कमलबाई पाटील व रवी पाटील यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.
नगरपरिषदेच्या हद्दीतील आर.के.नगर, भालेराव नगर, गूरूकूपा कॉलनी, प्रसाद नगर, संताजी नगर इ.भागात पावसाळ्यात नाल्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात नागरिकाच्या घरात तसेच आजूबाजूला परिसरात शिरते व मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरते तसेच तेथील नागरिकांचा अमळनेर शहराशी संपर्क तुटतो. यावर कायम स्वरूपी उपाय म्हणून अमळनेर नगरपरिषदेच्या तत्कालीन कौन्सिलने दि. २३ डिसेंबर २१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पिंप्राळा नाल्यावर कॉटन मार्केटच्या मागे जुन्या छोट्या पूला ऐवजी नवीन मोठा पूल मंजूर केला असून त्यांचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे तसेच पाण्याला अडथळा निर्माण करणारे नाल्यातील अतिक्रमणासह काटेरी झाडे झुडपे काढून नाला खोल करण्यात यावा व या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यात यावा याकरिता प्रभाग क्रं 14 च्या मा.नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील तसेच विश्वनाथ (रवि) पितांबर पाटील यांनी प्रांताधिकारी तथा न.प.प्रशासक सौ.सिमा अहिरे, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले असून निवेदनाची प्रत माहितीस्तव जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पाठवली आहे.