
अमळनेर : दुकानाच्या व्यवहारावरून दोन गटात वाद होऊन एकमेकांविरुद्ध विनयभंग व हाणामारीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पानखिडकी येथील एका महिलेने फिर्याद दिली की दिलीप हरकचंद जैन यांच्या मालकीचे टी पी ६५/२ चे सुदीप मेडिकलसह आठ दुकाने याचा सौदा ३ कोटी ७१ लाखात २५ ऑक्टोबर २०२४ रोजी केला व त्याची खरेदी १० ऑगस्ट २०२५ पावेतो पीडित व पती तसेच मुलांच्या नवे करायची होती. तीन दुकांनाचा ताबा त्यांना देण्यात आला होता. २२ जुलै रोजी दुपारी दोन वाजता दिलीप हरकचंद जैन , पंकज दिलीप जैन , चांदणी पंकज जैन तिन्ही रा सुदीप कॉम्प्लेक्स व ऋषभ मुकेश शहा रा त्रिकोणी बगीचा यांनी दुकान खाली करा नाहीतर तुम्हाला मारू अशी धमकी दिली. म्हणून पीडितेचा मुलगा प्रतीक जैन याने दुकांनाचे शटर लावून कुलूप लावले असता दिलीप जैन व ऋषभ शहा यांनी प्रतीक व पुतण्या गौतम जैन याना मारहाण केली. तर पंकज जैन याने पुतणीला खाली पाडले. दिलीप जैन याने महिलेला ओढून विनयभंग केला. यात महिलेची सोन्याची चैन तुटून नुकसान झाले. महिलेच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या गटातर्फे न्यू प्लॉट मुबई चौपाटी अमळनेर येथील महिलेने फिर्याद दिली की २२ रोजी दुपारी दोन वाजता ती दुकानावर असताना प्रतिक संजय जैन व गौतम मांगीलाल जैन हे दोघे आले आणि दुकांनाचे कुलूप उघडू लागले. त्यावेळी तिचे सासरे दिलीप जैन यांनी त्यांना जाब विचारला तर राग येऊन त्यांनी दिलीप जैन याना मारहाण केली. तसेच पीडितेचा विनयभंग केला. महिलेच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

