
अमळनेर:- तालुक्यातील कन्हेरे येथे ड्रॉन कॅमेराद्वारे गावठाण सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली असून यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
ड्रॉन कॅमेराद्वारे कन्हेरे गावातील गावठाण सर्वेक्षणप्रसंगी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलींद वाघ यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंचा छायाबाई सतीश पाटील, उपसरपंच सुवर्णा प्रविण पाटील, शालुबाई गोविंदा पाटील, सतिष लक्ष्मण पाटील, प्रविण दौलत पाटील, गोविंदा तुळशीराम पाटील, ग्रामसेवक विजय माळी, तलाठी जितेंद्र अशोक जोगी, कोतवाल सुरेश सोनवणे यासह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.







