
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील जवखेडा रोडवर लावलेली ट्रॉली चोरीला गेली असून मारवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथील फिरोज गयासोद्दिन खाटीक यांच्या मालकीची ५५ हजार किमतीची निळ्या रंगाची ट्रॉली ही जवखेडा रोडवरून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता मिळून न आल्याने चोरट्यांनी नेल्याचे स्पष्ट झाल्याने मारवड पोलीसात कलम ३७९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. भरत गायकवाड करीत आहेत.




