खान्देश मराठा पाटील मंडळाचे सचिव प्रविण पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील पातोंडा परिसर विकास मंच संस्थेला पर्यावरण घटकांवर काम करण्यासाठी खान्देश मराठा पाटील मंडळ कल्याणचे सचिव प्रविण पाटील यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नातील खर्च वाचवुन पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांची आर्थिक देणगी नववधू-वराच्या हस्ते सदर संस्थेला सुपूर्द केली.
सदर देणगी ही पर्यावरण संरक्षणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे घनश्याम पाटील यांनी सांगितले. प्रवीण पाटील हे नेहमी गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व नैसर्गिक घटकांवर काम करणाऱ्यांना प्रोत्साहित म्हणून सतत आर्थिक देणगी देत असतात.त्यांच्या ह्या उदारवादी कृत्याचे ग्रामस्थांकडून नेहमीच कौतुक केले जाते.यावेळी मनपाचे माजी अधिकारी कपिल पवार, पातोंडा विकास संस्थेचे विलास चव्हाण, राजन बिरारी आदी उपस्थित होते.