
अमळनेर:- येथील पिंपळे रोड परिसरातील मरीआई मंदिराचा जिर्णोद्धार करून सदर मंदिरावर वासुदेव जोशी गोंधळी समाजातर्फे सालाबादाप्रमाणे पारंपारिक पद्धतीने मरीआईची चक्रपूजा करण्यात आली.सदरची पूजा “कढई पूजा” म्हणून प्रसिद्ध आहे.
अनेक दशकांपासून गावाबाहेर राहिलेल्या मरीआई मंदिरावर जोशी गोंधळी समाजातर्फे श्रावण महिन्यात संपूर्ण वासुदेव जोशी गोंधळी समाजातर्फे सामूहिक चक्रपूजा करण्यात येते. पिंपळे रोडच्या विस्तारीकरणाच्या कामानंतर सदर मंदिराचा जिर्णोद्धार करून घेण्यात आला. नवसाला पावणारी मरीआई म्हणून या मंदिरावर भाविक प्रार्थनेसाठी येत असतात.यंदा जोशीपुरा येथून वासुदेव जोशी गोंधळी समाजातर्फे वाजत गाजत मिरवणुकीने महिला व नागरिक पिंपळे नाल्याजवळ असलेल्या मरीआई मंदिरापर्यंत देवीचा जयघोष करीत आले.यावेळी महिला हातात देवीचे ताट, नेवैद्य पूजा थाळी सोबत घेऊन सहभागी झाल्या होत्या.नविन जोडप्यांनी देवीची पूजा केली.तर सामूहिक आरती करण्यात आली.
यावेळी समाजाचे अध्यक्ष विलास दोरकर, उपाध्यक्ष नारायण शिंदे,यांचेसह अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, समाज पंच मंडळ व कार्यकर्ते कपिल दोरकर, भगवान शिंदे, रविंद्र शिंदे, महेश जोशी, योगेश शिंदे, देवेद्र दोरकर, दिपक दोरकर सुमित दोरकर, हरीश विधाते, नरेंद्र दोरकर ,आदित्य दोरकर, येतीश शिंदे ,जयेश दोरकर, नयन शिंदे , विनोद दोरकर,रोहित भोपे यांचेसह वैशाली दोरकर, विस्तार अधिकारी सौ.शैलजा शिंदे गोदावरी दोरकर, वंदना शिंदे, कमलबाई शिंदे ,नयना अहिरराव,अनिता दोरकर , मनीषा दोरकर ,पुष्पा दोरकर , मीना दोरकर, रजनी विधाते, सिमा भोपे, शोभा दोरकर आदिंसह समाजबांधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

