अमळनेर:- तालुक्यातील धार येथे गावठी दारू विकत असलेल्या दोघांवर मारवड पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स.पो. नि. जयेश खलाणे यांना मिळालेल्या माहितीनुसार पो. उ. नि. विनोद पाटील, पो.ना. मुकेश साळुंखे, सुनील तेली, उज्वल पाटील यांनी धार येथे प्लॉट भागात छापा टाकला असता प्रवीण काशिराम सैंदाणे हा घरासमोर मोकळ्या जागेत प्लास्टिकचा ड्रम घेवून बसलेला दिसला. त्याला जागीच पकडले असता त्याच्याकडून ३० लिटर गावठी दारू मिळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. यावेळी पोलिसांना खबर मिळाली की, गावात अजुन एक जण गावठी दारू विक्री करीत आहे. त्या माहितीनुसार छापा टाकला असता संजय काशीराम सैंदाणे हा घराच्या आडोश्याला दारू विक्री करताना दिसून आला. त्याच्याकडून १२०० रुपये किमतीची ४० लिटर दारू जप्त करण्यात आली. त्यावरून मारवड पोलीसात दोन्ही आरोपींविरुद्ध मु.प्रो. ॲक्ट ६५ (ई) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. ना. मुकेश साळुंखे हे करीत आहेत.