
अमळनेर:- तालुक्यातील चिमणपुरी पिंपळेच्या येथील स्मशानभूमीत विविध प्रकारच्या शंभर वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वेळी कामगार आयुक्त मुंबई विजय चौधरी यांनी झाडाला संगोपन करण्यासाठी लोखंडी जाड्या दिल्या व डॉक्टर बी ओ पाटील यांनी वड व पिंपळाचे झाडे सहा ते सात फुटाचे झाडे उपलब्ध करून दिले.
सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांच्या सहकार्याने स्मशानभूमी व रस्त्याच्या दोन्ही कडेला खड्डे खोदून यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. पुरुषोत्तम लोटन चौधरी, गोकुळ पाटील, संतोष चौधरी, गणेश लक्ष्मण पाटील, आबा पाटील, सतीश तुला पाटील, लोटन भिल, अनिल पाटील, राजेंद्र पाटील देविदास पाटील नामू भिल मोठ्या संख्येने यात ग्रामस्थांनी सहकार्य केले. वृक्ष संगोपन करण्याचे कामाची जबाबदारी ग्रामस्थांनी स्वतःवर घेतली आहे.

